खुशखबर ! ‘ही’ दुचाकी, चारचाकी वाहने होणार स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून २१ जून रोजी जीएसटी काउंसिलची बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, असे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात यात आहे. या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांवर असणाऱ्या करांमध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. त्याचबरोबर बॅटरीवर चालणाऱ्या चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहनांवरील जीएसटीमध्ये कपात होण्याची शक्यता या बैठकीत वर्तवण्यात येत आहे. सध्या या वाहनांवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येते. यात कपात करून ती ५ टक्के इतकी करण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जात आहे.

या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आला तर दुचाकी ५ हजार रुपयांपर्यंत तर चारचाकी १ लाख रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतात. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली २१ जून रोजी हि बैठक पार पडणार आहे. त्याचबरोबर जीएसटी स्लॅबमध्ये देखील बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याचे देखील समोर येत आहे. २८ टक्क्यांच्या स्लॅबमधून काही वस्तू वगळण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या बैठकीत प्रत्येक राज्यात जीएसटी अपीलेट ट्रिब्यूनल उभारण्यासंबंधी देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २१ तारखेला या बैठकीत काय निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन