GST कौन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय ! टेक्सटाईलवर 5 टक्केच लागणार जीएसटी : सूत्र

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  GST | सूत्रांनुसार जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत (GST Council 46th Meeting) टेक्सटाईलवर 5 टक्केच जीएसटी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अगोदर सरकारकडून टेक्सटाईलवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (GST)

सध्या टेक्सटाईलवर 5 टक्के जीएसटी लावला जात आहे. सूत्रांनुसार, जीएसटीमध्ये कोणत्याही प्रकारच्या बदलांबाबत सर्व राज्यांची सहमती आहे. एक जानेवारी 2022 पासून केंद्र सरकारने नैसर्गिक फायबर उत्पादनांवरील कर 5 टक्केवरून वाढवून 12 टक्के करण्यासाठी अधिसूचित केले होते.

करातील वाढीला झाला होता विरोध

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सल्लागार अमित मित्रा यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते की, जर टॅक्स मागे घेतला नाही तर 15 लाख लोकांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे. त्यांनी म्हटले होते की, यामुळे याच्याशी संबंधीत इंडस्ट्रीचे लोक सुद्धा प्रभावित होतील. आणि एक लाख छोटी युनिट बंद होऊ शकतात. (GST)

त्यांनी म्हटले होते की, अनेक युनिट असंघटित क्षेत्रात परत येतील. त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केला होता की, करात वाढ करण्यापूर्वी जीएसटी परिषदेत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली नव्हती. मात्र, अजूनपर्यंत टेक्सटाईलवर जीएसटी रोल बॅक करण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

80 लाखापेक्षा जास्त व्यापारी यांच्याशी संबंधीत आहेत. जीएसटी कौन्सिलमध्ये राज्यांचे प्रतिनिधीच असल्याने 5 राज्यांतील निवडणुका पाहता हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Web Title : GST | gst council 46th meeting gst will be levied only 5 percent on textiles sources 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Gram Ujala Scheme | 12 वॅट LED बल्ब अवघ्या 10 रुपयात! जाणून घ्या पूर्ण योजना आणि लाभ घेण्याची शेवटची तारीख