खुशखबर ! मोदी 2.0 सरकार काही ‘वस्तू’ व ‘सेवा’ स्वस्त करण्याच्या तयारीत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 20 जूनला जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडणार आहे. मोदी सरकारच्या नव्या कार्याकाळातील ही पहिली बैठक असेल. या बैठकीत मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असेल. या बैठकीत काही वस्तू व सेवा स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मागणीत स्थिरता आल्याने वस्तू व सेवा कराचा आराखडा बदण्यात येणार आहे. 28 टक्याच्या टप्प्यात येणाऱ्या अनेक वस्तू कमी टप्प्यात आणण्याचा सरकारचा विचार आहे. काही राज्यांनी कराचे दर कमी करण्याची विनंती केली आहे. इलेक्ट्राँनिक इनवॉयिस सुरु करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला जाऊ शकतो. अ‍ॅन्टी प्रॉफिटियरिंग फ्रेमवर्कचा विस्तार करण्याचा विचार बैठकीत केला जाण्याची शक्यता आहे.

5 जुलैला मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाआधी जीएसटी कौन्सिलची बैठक 20 जूनला होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची देखील जीएसटी कौन्सिलच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक असणार आहे.

मागणी कमी झाल्याने त्यावर उपाय म्हणून लवकरात लवकर पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. जर मागणीची सुस्ती वाढली तर यांचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. नोकऱ्यावर देखील संकट निर्माण होऊ शकते. अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, तर नोकरी मिळण्याचे प्रमाण देखील कमी होईल.

त्यामुळे यावेळी योग्य तो निर्णय घेऊन सरकार जीएसटी कर कमी करण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर भार येणार नाही. त्यामुळे 25 टक्क्यांच्या टप्प्यात येणाऱ्या वस्तू व सेवा लवकरच 18 किंवा इतर टप्प्यात येण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी