GST | नवीन वर्षात तयार कपडे अन् पादत्राणांच्या किंमती 5 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी GST कौन्सिलची बैठक झाली होती. त्यामध्ये एक हजार रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या तयार कपडे व पादत्राणांवरील GST चा दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार केंद्रीय मंत्रालयाने जीएसटीचा दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे नवीन वर्षात तयार कपडे, पादत्राणे घेणे होणार महाग होणार आहे.

GST परिषदेच्या बैठकीमध्ये तयार कपडे तसेच सूत आणि सुती कापड यावर वेगवेगळ्या दराने आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये सुसूत्रता आणण्याचा निर्णय झाला. मात्र सरकारतर्फे ५ टक्के असलेला जीएसटी सरसकट १२ टक्के करण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. येत्या १ जानेवारीपासून ही नवी वाढ लागून होणार असल्याने सर्वच किमतीचे तयार कपडे आणखी महाग होणार आहेत. याशिवाय रंग, कापडे अशा उत्पादनांच्या किमतींमध्येही वाढणार आहेत. याबरोबरच एक हजार रुपयांवरून अधिक किमतीच्या पादत्रणेही महाग हाेणार आहेत.

सीएमएआय अध्यक्ष राजेश मसंद (CMAI President Rajesh Masand) म्हणाले, वस्त्रोद्योग मोठ्या संकटांचा सामना करीत आहे.
यापूर्वीच तयार कपड्यांसाठीच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे तशाही कपड्यांच्या किमती १५ ते २० टक्के वाढणारच होत्या.
त्यातच GST त वाढ झाल्याने या किमती वाढण्याची भीती आहे.

 

Web Title :- GST | gst on apparel textiles and footwear up from 5 to 12 effective january 2022 marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PIB Fact Check | केंद्र सरकार महिलांच्या अकाऊंटमध्ये जमा करतेय 2.20 लाख रुपये? जाणून घ्या वायरल Video चे पूर्ण सत्य

Rohit Sharma Records | अफलातून ‘हिटमॅन’ ! रोहित शर्मानं केली विराट अन् बाबरची बरोबरी, एकाच मॅचमध्ये केलं ‘हे’ 6 मोठे रेकॉर्ड

EPFO | किमान पेन्शन आणि व्याजदरावर आज येणार निर्णय ! 3000 रुपये होऊ शकते पेन्शन, जाणून घ्या सविस्तर