GST | कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! AAR ने म्हटले – ‘कँटीन चार्जवर लागणार नाही जीएसटी’

नवी दिल्ली : कर्मचार्‍यांद्वारे कँटीन सुविधेसाठी केलेल्या पेमेंटवर जीएसटी (GST) लागणार नाही. अथॉरिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रूलिंग म्हणजे एएआर (Authority for Advance Ruling) ने ही व्यवस्था केली आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) ने एएआरच्या गुजरात पीठाशी संपर्क साधून ही माहिती मागितली होती की त्यांच्या कर्मचार्‍यांनी कँटिन सुविधा वापरल्यानंतर त्यांच्याकडून वसूल केलेल्या किरकोळ रक्कमेवर जीएसटी (GST) लागेल का?

याशिवाय कंपनीने हे सुद्धा विचारले होते की, कारखान्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या कँटिन सुविधांवर सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे घेतल्या गेलेल्या जीएसटीवर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) ची सुविधा मिळेल का?

एएआरने आपल्या निर्णयात हे म्हटले की, टाटा मोटर्सने आपल्या कर्मचार्‍यांसाठी कँटिन व्यवस्था केली आहे, ज्याचे संचालन थर्डपार्टी सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे केले जात आहे. या व्यवस्थेअंतर्गत कँटिन चार्जच्या एका मोठ्या हिश्याचा भार कंपनी घेते आणि उर्वरित कर्मचारी उचलत आहेत.

कर्मचार्‍यांच्या हिश्यातील कँटिन शुल्क कंपनीद्वारे जमवले जाते आणि ते सर्व्हिस प्रोव्हायडरला दिले जाते. याशिवाय टाटा मोटर्सने हे सुद्धा सांगितले की, कर्मचार्‍यांकडून कँटिन शुल्क वसूलीत ते आपल्या नफ्याचे मार्जिन ठेवत नाहीत.

एएआरने म्हटले की, कँटिन सुविधेवर जीएसटी भरण्यासाठी आयटीसी जीएसटी कायद्यांतर्गत प्रतिबंधित क्रेडिट आहे आणि अर्जदाराला याचा लाभ मिळू शकत नाही.

एएमआरजी अँड असोसिएट्सचे सिनियर पार्टनर रजत मोहन यांनी म्हटले की, आता सबसिडीवाले
खाण्या-पिण्याचे सामान उपलब्ध करणार्‍या कंपन्या कर्मचार्‍यांकडून याच्या वसूलीवर पाच टक्के
कर घेत आहेत. एएआरने आता व्यवस्था दिली आहे की, जिथे कँटिन शुल्काचा एक मोठा भाग
कंपनीद्वारे दिला जाईल आणि कर्मचार्‍यांकडून केवळ किरकोळ शुल्क घेतले जाईल, त्यांना जीएसटी लागणार नाही.

हे देखील वाचा

NABARD | नाबार्डचे कर्ज आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 25.2 टक्के वाढून 6 लाख कोटी रुपयांवर पोहचले

Pune Crime | लाेणी काळभाेर परिसरात दहशत पसरविणारी टोळी तडीपार

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान केली ‘ही’ चूक तर होईल 3 वर्षांचा कारावास, भरावा लागेल दंड; जाणून घ्या


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  GST | no gst on canteen charges recovered from employees authority for advance ruling

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update