GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार, नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – GST on Notice period | प्राप्तिकर विभागाच्या ऑथोरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने (Authority for Advance Ruling) म्हटले की, नोटीस पिरियडमध्ये (Notice period) काम केल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार, ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीसाठी (group insurance policy) कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त प्रिमियम घेण्यासाठी आणि त्यांचे फोन बिल भरण्यावर आता कंपनीला जीएसटी (GST) भरवा लागणार आहे. (GST on Notice Period)

 

काय आहे आदेश?
प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) आदेशानुसार, कर्मचारी नोटिस पीरियड पूर्ण करताना कंपनी प्रत्यक्षात त्या कर्मचाऱ्याला एक सेवा पुरवत आहे आणि त्यामुळे त्यावर जीएसटी कर (GST on Notice period) आकारला पाहिजे. जीएसटीच्या नियमांनुसार त्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी कर लागतो जिथे ती क्रिया सेवेच्या रुपात सादर केली जाते. एखाद्या कर्मचाऱ्याला तो ज्या कंपनीत काम करतो आहे, ती कंपनी सोडताना सर्वसाधारणपणे तीस दिवसांचा नोटीस पिरियड द्यावा लागतो. कंपनी या कालावधीसाठी देखील कर्मचाऱ्याला वेतन देते. परंतु ऑथोरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग नुसार कर्मचाऱ्याच्या या वेतनावर कंपनीला आता जीएसटी कर भरावा लागणार आहे.

पॉलिसी आणि इतर बिलांवर लागणार GST
नोटीस पिरियडमध्ये वेतनाबरोबरच कंपनीने जर एखादी ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी कर्मचाऱ्यासाठी घेतली असेल आणि त्याच्या प्रीमियमचा (premium) एक हिस्सा कंपनी जर आपल्या कर्मचाऱ्यांकडून घेत असेल तर त्या अतिरिक्त प्रिमयमवरदेखील कंपनीला जीएसटी भरावा लागणार आहे. तसेच जर कंपनीने त्या कर्मचाऱ्याच्या मोबाईल बील भरत असेल तर त्यावरदेखील कंपनीला जीएसटी कर द्यावा लागणार आहे. मोबाईल बिलावर आधीपासूनच जीएसटी कर द्यावा लागतो.

 

कर्मचाऱ्यांना बसणार फटका
आदेशानुसार या सेवेवरील जीएसटी कर (GST tax) हा कंपनीने भरायचा आहे.
परंतु ही गोष्ट देखील स्पष्ट आहे की कंपन्या बहुतांश पणे अशा प्रकारच्या सेवा आणि त्यावरील खर्चाचा बोजा कर्मचाऱ्यांवर टाकतात.
त्यामुळे अनेक कंपन्या हा जीएसटी आपल्या कर्मचाऱ्यांकडूनच वसूल करण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- now employer has to pay gst on salary paid during notice period of employee

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 903 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

DRDO Recruitment 2021 | 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! ‘डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इंडिया’मध्ये भरती; जाणून घ्या