GST स्लॅबच्या दरामध्ये होणार मोठे बदल ! महाग होणार ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सततच्या घटत्या जीएसटी रेव्हेन्यू कलेक्शन (GST Revenue Collection) आणि रेव्हेन्यू टार्गेट पूर्ण न झाल्यानं सरकार आता दुसऱ्या पर्यायावर विचार करत आहे. सरकार आता वस्तू आणि सेवा कर पॅनल (GST Panel) व रेव्हेन्यू कलेक्नश वाढवण्याचा विचार करत आहे. जीएसटी पॅनल 5 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबला 1 टक्क्यानं वाढवत 6 टक्के केला जाणार आहे.

बिजनेस स्टॅंडर्डनं आपल्या एका रिपोर्टनुमध्ये याबाबत माहिती दिली आहे. अशी आशा व्यक्त केली जात आहे की, जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यानं जीएसटी रेव्हेन्यू कलेक्शनमध्ये प्रति महिना 1000 कोटींची वाढ होईल. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, जीएसटी पॅनल या महिन्याच्या मध्यात राज्य आणि अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करू शकतं.

‘या’ गोष्टींवरही विचरा करत आहे जीएसटी पॅनल
जीएसटी पॅनल ज्या अन्य गोष्टींवर विचार करत आहे त्यात व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स (VAT)अंतर्गत येणाऱ्या वस्तूंना जीएसटी अंतर्गत समाविष्ट करणं याचाही समावेश आहे. याशिवाय सिगारेट आणि एअरेटेड ड्रिंक्स (Aerated Tax) वर लागणारं कंपेनसेशन सेसला (Compensation Cess) वाढवणं याचाही समावेश आहे.

कोणत्या स्लॅबमधून किती जीएसटी कलेक्शन होतं ?
अधिकृत आकड्यांनुसार, एकूण जीएसटी कलेक्शनमध्ये 5 टक्के जीएसटीपासून केली जाणारी रक्कम 5 टक्केच असते. 18 टक्क्यांच्या स्लॅबची एकूण भागिदारी 60 टक्के, 12 टक्के स्लॅबची भागिदारी 13 टक्के आणि 28 टक्के स्लॅबची भागिदारी 22 टक्के असते.

‘या’ वस्तू महागण्याची शक्यता
सध्याच्या रिस्ट्रक्चरींग प्रोसेसध्ये ऑटो सेक्टरचा समावेश नाही. परंतु रिपोर्टमध्ये एका वरीष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं लिहण्यात आलं आहे की, एअरेटेड ड्रिंक्स आणि सिगारेटच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 65 मिलीच्या सिगारेटवर 5 टक्के सेस लागतो. याशिवाय प्रत्येक 1000 सिगारेटवर 2076 रुपयांचा अतिरीक्त सेस द्यायचा असतो. 75 मिलीच्या लांब सिगारेटवर 5 टक्क्यांच्या दरानं सेस लागतो. याशिवाय 1000 सिगारेटवर 3668 रुपये अतिरीक्त सेस लावला जातो.

Visit : Policenama.com