लॉकडाऊन दरम्यान व्यापाऱ्यांना मोठा दिलासा ! GST बाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूमुळे जगात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे सरकारने व्यावसायिकांना जीएसटी रिटर्न भरण्यास दिलासा दिला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख सरकारने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे.

वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, कंपनी अ‍ॅक्ट 2013 च्या तरतुदीनुसार नोंदणीकृत लोक इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड-ईव्हीसीमार्फत जीएसटीआर -3B बी दाखल करू शकतात.

महसूल विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कंपनी अधिनियम 2013 च्या तरतुदीनुसार नोंदणीकृत एखाद्या व्यक्तीला 21 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंत ईव्हीसीमार्फत व्हीव्हीसी (सत्यापित) फॉर्म जीएसटीआर 3 बीद्वारे रिटर्न फाइल करण्याची मंजुरी दिली जाईल.

यापूर्वी, वर्ष 2018-19 साठी जीएसटी रिटर्न फाईलची तारीख 30 जून होती. यावेळी अर्थमंत्र्यांनी असे सांगितले होते की, 5 कोटी रुपयांपर्यंतचे व्यवसाय असलेल्या कंपन्यांकडून जीएसटी रिटर्न भरण्यात होणाऱ्या विलंबावर कोणतेही शुल्क, दंड किंवा व्याज आकारला जाणार नाही. उशीरा रिटर्न फाईल करण्याच्या प्रकरणामध्ये विलंब शुल्काला 12% वरून 9% करण्यात आली आहे.