होय, GST फाईल करण्याची अंतिम तारीख वाढली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वित्तीय वर्ष २०१७- १८ साठीचे जीएसटी रिटर्न फाईल करण्याची यापूर्वीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१९ होती. आता जीएसटी रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. सीबीआयसी (CBIC ) कडून मिळालेल्या माहितीनुसार GSTR-9, GSTR-9A आणि GSTR-9C फॉर्म भरणाऱ्या करदात्यांना ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत जीएसटी रिटर्न फाईल करता येणार आहे.

वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत सर्व नोंदणीकृत व्यापाऱ्यांना प्रत्येक वर्षाला GSTR-9 या फॉर्मच्या माध्यमातून रिटर्न भरावे लागतात. महत्वाचे म्हणजे याच्या माध्यमातून वेगवेगळ्या टॅक्स स्लॅब नुसार खरेदी-विक्रीची माहितीही द्यावी लागते. मागच्या काही दिवसापासून जीएसटी रिटर्न भरण्यात अडचणी येत होत्या.

जीएसटी भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ असेल
पुन्हा एकदा सीबीआयसीने जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. वर्ष २०१७-१८ साठीचे जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१९ होती. ती आता वाढवून ३० नोव्हेंबर २०१९ केली गेली आहे. अशी माहिती सीबीआयसी (CBIC ) ने एका ट्विट च्या माध्यमातून दिली आहे. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी अनेक लोकांना अडचणी येत होत्या. अंतिम तारीख वाढवली गेल्यामुळे लोकांना आणखी वेळ भेटणार आहे. सुरवातीला जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख डिसेंबर २०१८ होती. आत्तापर्यंत ४ वेळेस तारीख वाढवली गेली आहे. काही लोकांना JSON फाईल आणि डिजिटल सिग्नेचर अपलोड करण्यासाठी अडचणी येत होत्या. आतापर्यंत केवळ १ % लोकांनी GSTR 9C रिटर्न भरले आहेत. जे काही १५ टक्के रिटर्न फाईल झाले आहेत त्यामध्ये निल रिटर्न भरणाऱ्यांची संख्या जास्त असू शकते. अशी माहिती समोर येत आहे.

देशभरात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस पडत आहे. त्यामुळे सुद्धा अनेक लोकांना जीएसटी रिटर्न भरण्यासाठी समस्या येत होत्या. आता अंतिम तारीख वाढवली असल्यामुळे लोकांना मदत मिळणार आहे.