कोरोना संकटात देशाच्या अर्थचक्रावरून मोदी सरकारला मोठा दिलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेला जोरात फटका बसलेला आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात वित्तीय तूट निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे पाहता मार्च महिन्यात सरकारला वस्तू आणि सेवा करातुन १.२३ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाची तुलना केली असता तब्बल २७ टक्के इतकी वाढ आहे. यामुळे मोदी सरकारला एक दिलासा मिळाला आहे. यावरून देशाची आर्थिक चक्र सुरळीत होताना दिसत आहे.

अर्थव्यवस्थेला बसलेला फटका हा थेट कर संकलनावर होतो. त्यामुळे पूर्ण अर्थचक्र डबगायला येते. लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानामुळे लोकांची मागणी कमी आली. मात्र आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे. मार्च महिन्यात GST च्या माध्यमातून १.२३ लाख कोटींचं संकलन झालं आहे. GST च्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात संकलन झालं आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याची स्थिती असताना सुद्धा अर्थव्यवस्थेचे चक्र सुरळीत असल्याचे दिसत आहे.

GST, Income tax, सीमा शुल्क यांच्याकडून मिळणाऱ्या कागदपत्रांचा वापर करून बोगस बिलिंग करणाऱ्यांविरोधात महत्त्वाची पावले उचलण्यात आली. त्याचा थेट परिणाम कर संकलनावर झाला. GST लागू झाल्यापासून आतापर्यंत कधीही इतक्या प्रमाणात कर संकलन झालेलं नाही. खोट्या बिलांच्या नावावरून करवसुली करणाऱ्याना गंडा घालण्याचे उद्योग थांबवण्याकडे अर्थ मंत्रालयाकडून विशेष लक्ष दिल आहे. बोगस बिलं तयार करणाऱ्यांना जोरदार झटका बसला असून महसुलात वाढ झाली आहे. GST तून मिळणारा महसूल सलग ६ व्यांदा १ लाख कोटींच्या पुढे गेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटातून उभारी घेत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.