नोकरीच्या आमिषाने फसविणार्‍या पालकमंत्र्याच्या भावकीतील एकाला अटक, वरिष्ठ पोलिस निरीक्षकालाही गंडविले ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव सांगून सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडविणाऱ्या त्यांच्याच भावकीतील अक्षय अविनाश शिंदे (रा.चौंडी, ता. जामखेड) यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याने स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्तीचे आमिष दाखवून एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला साडेचार लाख रुपयांना गंडविल्याची चर्चा आहे.

याबाबत माहिती अशी की, अक्षय शिंदे हा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव सांगून अनेकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करीत होता.

कर्जत तालुक्यातील एका युवकाला नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. नोकरी न मिळाल्याने फसवणुकीची रक्कम परत मागितली असता त्याने जातीवाचक शिवीगाळ केली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक सातव यांच्याकडे आहे. अक्षय अविनाश शिंदे हा मुंबई येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यावरून पीएसआय ज्ञानेश फडतरे, पोलीस कॉन्स्टेबल सोहेल ढाकणे, सागर ससाणे, सागर गवांदे, राहुल सोळंके आदींच्या पथकाने मुंबई येथून अक्षय शिंदे याला ताब्यात घेतले. त्याला पुढील चौकशीसाठी कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

अक्षय शिंदे यांनी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला स्थानिक गुन्हे शाखेचे नेमणूक देण्याचे आश्वासन दाखवून साडेचार लाख रुपये स्वीकारले होते. परंतु सदर पोलीस निरीक्षकाची नियुक्ती स्थानिक गुन्हे शाखेत होऊ शकली नव्हती.

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे