सुरक्षेच्या मुद्यावर पालकमंत्र्यांचे मौन : अजित पवार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरात महिला अत्याचार, लहान मुलींवर अत्याचार, छेडछाड, सोनसाखळी हिसकवणे, अत्याचार करून खून असे प्रकार वाढत असल्याने शहरातील कायदा-सुव्यस्थेचे धिंडवले निघाले आहेत. हिंजवडी, कासारसाई येथे उसतोड कामागाराच्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. त्यामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिला, तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना पुण्याचे पालकमंत्री मात्र मौन पाळून असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  त्यांनी दिला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04794d0c-c603-11e8-959e-0936e4fc3bdb’]

आकुर्डीत पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी शहरातील सत्ताधा-यांवर जोरदार हल्लाबोल केला. महिला सुरक्षा सोबत पालिकेतील इतर विषयावरून हल्ला चढविला. पुणे मेट्रो केवळ पुण्यासाठी नसून पिंपरी-चिंचवड शहरासाठी देखील आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड असे मेट्रोचे नामकरण करण्यात यावे. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी असे सांगत पवार म्हणाले, शहरात सर्वत्र कच-याचे साम्राज्य आहे. पाणीपुरवठा विस्कळीत आहे, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. पालिकेत सगळा भोंगळ कारभार सुरु आहे. सत्ताधा-यांनी केवळ पोकळ घोषणा करुन जनतेची दिशाभूल केली.

पंतप्रधान आवास योजनेला हरताळ फासला जात आहे. रावेत, च-होली, बो-हाडेवाडीतील आवास योजनेच्या कामाला अद्याप सुरुवात केली नाही. शिक्षण समितीच्या बैठकीचे विषयपत्र काढले जात नाही. सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसवेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नाहीत, असा हल्ला करत भाजप सपशेल अपयशी ठरला असल्याची टीका पवार यांनी केली.

ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे : महापौर जाधव

[amazon_link asins=’B00D75AB6I,B071Z8M4KX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1d982b5-c603-11e8-911c-75007ed73d97′]

जाहीरात