‘जजमेंट’च्या टीमने गुढीपाडवा साजरा करत जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी अनेक लोक आपल्या चांगल्या आणि नवीन गोष्टींची सुरुवात करतात. आता याच दिवसाचे औचित्य साधून ज्योत्स्ना फिल्म प्रॉडक्शन निर्मित जजमेंट या मराठी चित्रपटाच्या टीमने गुढीपाडवा साजरा केला आहे आणि आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 24 मे रोजी जजमेंट हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा एक वेगळा विषय आणि वेगळा अनुभव देणार चित्रपट आहे. या चित्रपटात मंगेश देशाई, तेजश्री प्रधान, आणि माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

View this post on Instagram

#Repost @filmjudgement • • • • • जजमेंट | 24 मे 2019 मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. 'जजमेंट' तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात … 24 मे पासून Based on a Novel by #NeelaSatyanrayan #JudgementFilm #24May Starring – @tejashripradhan , @mangeshdesaii , Madhav Abhyankar Directed by #SameerSurve Produced by #DrPRKhandare Co- Produced by #HarshMKrishnatrey #NazirKhan #YogeshArunGogate #NavalShastri #MandarCholkar #JavedAli #AnandiJoshi #NileshDahanukar #DevdattaRaut #DrGirishMugli #JitendraMhatre #AmrutaMane #SameerBhosale #MilindMatkar

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

या चित्रपटाची मुख्य कथा ही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे पोस्टर बघता चित्रपट एक रोमांचकारी अनुभव देणारा असेल याचा अदांज येतो. या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान हे दोघे वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. याशिवाय मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान प्रथमच एकत्र झळकणार आहेत.

श्री पार्टनर फेम श्वेता पगार ही देखील या चित्रपटात झळकणार असून तिचीही यात मुख्य भूमिका असणार आहे. या व्यतिरीक्त या चित्रपटात सतीश सलागरे, किशोरी अंबिये , महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत.

हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याच्या ऋण या कादंबरीवर आधारीत असल्याचं समजत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर रमेश सुर्वे यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like