Gufi Paintal Passes Away | महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं 78 व्या वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gufi Paintal Passes Away | महाभारतात शकुनी मामाची भूमिका (Mahabharat Shakuni Mama Actor) साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं 78 व्या वर्षी आज (सोमवार दि. 5 जून 2023) निधन झालं. ते गेल्या काही दिवसांपासुन आजारी होते. त्यांना मुंबईतील अंधेरीमधील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी गुफी पेंटल यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. गुफी हे फरिदाबादमध्ये असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तेथे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं होतं. (Gufi Paintal Passes Away)
अखेर आज अंधेरी येथील रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुफी यांनी सन 1975 मध्ये रफू चक्कर या हिंदी सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सन 1988 मध्ये त्यांना बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतून खरी ओळख मिळाली होती. (Gufi Paintal Death)
Web Title : Gufi Paintal Passes Away | mahabharat shakuni mama actor gufi paintal passes away in andheri hospital mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा