भरधाव डंपरने तीन महिलांना उडवले, दोन महिला जागीच ठार

गुहागरः पोलीसनामा ऑनलाइन
मुंबई- गोवा महामार्गावर चिपळुण खेरशेत येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या डंपरने भर दुपारी भरधाव वेगाने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या तीन माहिलांना उडवले. चिपळूणकडून जयगड जिंदाल कंपनीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाचा डंपरवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या तीन महिलांना उडवले.

या अपघाताची माहिती मिळताच सावर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.