सावधान ! LIC धारकांनी चुकून पण ‘या’ ७ गोष्टी करू नये पण केल्यास प्रचंड ‘अडचणी’, जाणून घ्या

पोलीसनामा : ऑनलाईन टीम –  भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीचे देशभरात कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि सुरक्षित जीवनासाठी नेहमी लोक LIC मध्ये पैशांची गुंतवणूक करतात. परंतु पॉलिसीच्या नावावर अनेक प्रकारचे घोटाळे देखील समोर येतात. यामुळे LIC कडून बँकेप्रमाणे मार्गदर्शक तत्वे दिली जातात. त्याच बरोबर या घोटाळ्यापासून लांब राहण्यासाठी सूचना केल्या जातात. LIC कडून देण्यात येणाऱ्या या मार्गदर्शक तत्वाकडे गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. त्याच बरोबर पॉलिसी घेताना काही गोष्टी लक्षात अत्यंत आवश्यक आहे.

LIC ग्राहकांनी लक्षात ठेवाव्या खालील गोष्टी

१. पॉलिसी प्रिमिअम भरण्यासाठी देण्यात येणारा चेक केवळ Life Insurance corporation of India च्या बाजूनेच असावा. जर कोणत्या दुसऱ्या नावाने चेक देण्यास तुम्हाला कोणी सांगितले तर त्याला स्पष्टपणे नकार द्या. त्याचबरोबर अशा वर्तवणुकीची माहिती लगेच LIC ला द्या.

२. नेहमी www.licindia.in या वेबसाईटवरच आपल्या पॉलिसीचे स्टेट्स चेक करा. पॉलिसीला अपडेट करण्यासाठी नवीन पॉलिसीची माहिती सतत घेत रहा. एजंटकडून देण्यात आलेल्या कोणत्याही कागदपत्रावर डोळे झाकून सही करू नका. कागदपत्र पडताळणीसाठी वेळ घ्या. काळजीपूर्वक वाचल्यानंतरच सही करा.

३. पॉलिसीचे खरी कागदपत्रे कधीही कोणाला देऊ नका. LIC कधीही कोणत्याही नागरिकाला ग्राहकांकडून खरी कागदपत्रे गोळा करायला सांगत नाही.

४. फोनवर येणाऱ्या ऑफर्सपासून सावध रहा. फोन करून तुम्हाला मी LIC एजंट असल्याची खोटी माहिती देऊन तुम्हाला फसविण्यात येऊ शकते. कोणत्याही प्रकारचे LIC चे पेमेंट करताना तो LIC चाच एजंट असल्याची खात्री करून घ्या.

५. LIC कडून कधीही बोनससाठी फोनवर संपर्क साधला जात नाही. अशा प्रकारचे फोन हे स्पॅम कॉल असू शकतात.

६. LIC ला NEFT चा वापर करूनच पेमेंट करा. हे पेमेंट करण्याचा सुरक्षित मार्ग आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा होऊ शकत नाही.

७. LIC शी संबंधीत कोणत्याही प्रकारच्या घोटाळ्याची शंका वाटली तर लगेच LIC शी संपर्क साधा.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

Loading...
You might also like