‘कोरोना’ला ब्रेक लावण्यासाठी सोसायट्यांना पोलिसांकडून मार्गदर्शक सुचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  वाढत्या कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी पुणे पोलिसांनी रहिवासी सोसायट्याना मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. त्यानुसार सोसायटी धारकांनी त्याचे पालन करावे असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे.

शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. सोसायट्यांमध्ये सर्वाधिक संक्रमन होत असल्याचे दिसून आले आहे. त्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी मार्गदर्शीका जारी केली आहे. त्यामध्ये प्रवेशद्वाराचे नियमन कसे करायचे, सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे, जीवनाश्यक वस्तू विक्रेता कामगार, कुरिअर पुरविणारे याबाबत सांगण्यात आले आहे.

सोसायटीसाठी प्रवेशद्वाराचे नियमन

–  सोसायटीत प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य, प्रवेशद्वार व लिफ्टजवळ वॉश बेसीन, हॅण्ड सॅनिटायझर स्टॅण्ड बसवावा

  लिफ्ट, स्वच्छतागृह, जिना सॅनिटायझर करावे.

–  सोसायटीत प्रवेश करणार्‍या प्रत्येक व्यक्तीची थर्मल मशीनद्वारे शरीराचे तापमान मोजण्यात यावे.

–  ऑक्सिमिटर मशिनद्वारे तपासणी करून 95 पेक्षा पातळी कमी असल्यास संबंधीत व्यक्तीची तत्काळ तपासणी करून घ्यावी.

सोसाटीच्या परिसरात वावरताना दोन मिटर अंतर राखावे, गर्दी करु नये. परदेशातून किंवा इतर प्रांतातून आलेल्या व्यक्तीच्या संदर्भात विलगिकरणाच्या सुचनांची खात्री करून अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे.

घरकाम करणारी व्यक्ती घरात येईल तेव्हा तिला एक कापडी बॅग व्यक्तीगत वस्तू ठेवण्यासाठी द्यावी. हात तोंड चेहरा साबणाने स्वच्छ धुवायला सांगा, या व्यक्तींना मास्क वापरने अनिवार्य करावे.

दुध, भाजीपाला, पेपर अन्य वस्तू विक्रेता, सफाई कर्मचारी, घरकामगार करणार्‍या महिला यांची प्रवेशद्वारावर दररोज स्क्रिनिंग टेस्ट व सॅनिटायझेशन नंतरच सोसायटीत प्रवेश द्यावा.

घरकाम करणार्‍या महिला, सुरक्षा रक्षक , वाहनचालाक प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे नसावेत. पावसाळी दुरुस्ती व्यतिरिक्त इतर कोणतीही कामे करण्यास प्रतिबंध करावा. नवीन बांधकाम व नुतनीकरणाच्या कामास परवानगी देऊ नये.