अभिनेत्री कियारा आडवाणी बॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’ करण्यापूर्वी ‘या’ गोष्टीपासून वाचण्यासाठी करायची ‘प्रार्थना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी हिच्यासाठी 2019 लकी ठरलं. तिच्या कबीर सिंह या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या सिनेमात अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा प्रमुख भूमिकेत होते. यानंतर वर्षाच्या शेवटी ती गुडन्यूज सिनेमात दिसली. या सिनेमात अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा प्रमुख भूमिकेत होते.

यावर्षीही कियाराकडे अनेक चांगले सिनेमे आहेत. कियाराची एक इच्छा होती ज्यासाठी ती प्रार्थना करायची. कियारा भीती होती तिनं एकसारखेच सिनेमे करू नये. यासाठी यापासून वाटण्यासाठी ती प्रार्थना करायची. खुद्द कियारानंच याबाबत खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना कियारा म्हणाली, “मी पाहते अनेक अभिनेत्रींना एकाच प्रकारचे रोल ऑफर होतात. जेव्हा मी माझं करिअर सुरू केलं तेव्हा हीच प्रार्थना करायचे की, एकसारखेच रोल मिळू नयेत. परंतु जे सिनेमे मला ऑफर झाले ते एकमेकांपेक्षा वेगळे होते. खरंतर हे आपोआप झालं. परंतु मला हेच हवं होतं. मी स्वत:ला भाग्यवान समजते लोकांनी मला एकाच ब्रॅकेटमध्ये ठेवलं नाही.”

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुडन्यूजनंतर आता तिच्यकडे अनेक सिनेमे आहेत. कियारा लक्ष्मी बॉम्ब, इंदू की जवानी, भूल भूलैया 2 आणि शेरशाह अशा अनेक मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. गुड न्यूजंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी बॉम्ब सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/B0RbWeRJmef/