Guinness Book of World Record | ‘बम’वर रिंग टाकून ‘हुलाहुप’ ! महिलेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Guinness Book of World Record | लोक वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) करण्यासाठी काहीही करत असतात. अशाच एका मुलीने अशा प्रकारे हुला हुप केले (Hula HooP) की बघणारे चकीत झाले. या मुलीने चक्क आपल्या बमवर (bum) रिंग फिरवून हुला हुप केले आहे. मुख्य म्हणजे तिच्या या टॅलेंटची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness Book of World Record) घेतली आहे. या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हुला हुप म्हणजे गोल नळी सारख्या आकाराची मोठी रिंग असते. ती कंबरेत घालुन फिरवतात.

या मुलीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत पहिल्यांदाच असा उपक्रम केला आहे. या महिलेचे नाव आहे अँड्रिया एम. (Andrea M.) तिने आपल्या बम्प्सवर सलग 31 मिनिट 25 सेकंद हुला हूप केलं आहे. तिचा हा रेकॉर्ड बघुन अनेकांनी तोंडात बोटं घातली तर अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे तिने केलेला हा पहिला रेकॉर्ड असल्याने रेकॉर्डसच्या यादीत नवा विभाग सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांना आता या विभागात आपले नाव येण्यासाठी तिचे रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

कसा केला तिने रेकॉर्ड ?

अँड्रिया गेली दोन वर्षे बमवर हुला हूप करण्याचा सराव करत होती तीने यासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत. तीने सांगितले की, बमवर हुला हूप फिरवताना मांडीच्या स्नायुंमध्ये भरपूर वेदना होतात पण ध्येयाने झपाटल्याने मी हे लक्ष्य साध्य केलं आहे. तिचा हा व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 76 हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत.

हे देखील वाचा

Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात 10,458 ‘कोरोना’मुक्त, 8,992 नवीन रुग्ण

Pune News | पुणे 4 वाजता लॉक झालंच पाहिजे, अन्यथा कडक कारवाई करा, अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Guinness Book of World Record notes woman who hurled ring bomb

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update