‘RJ’ नंतर आता ‘GJ’ मधून आला मुलांच्या मृत्यूचा मोठा ‘आकडा’, महिन्याभरात राजकोटमध्ये 111 तर अहमदाबादमध्ये 85 निष्पापांचा ‘बळी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोटा च्या जेके लोन हॉस्पिटल (JK Lon Hospital) येथील निष्पाप मुलांच्या मृत्यूची संख्या वाढतच आहे. शनिवारी अजून ३ मुलांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढून ११० वर गेला आहे. आता कोटा नंतर गुजरात मध्ये देखील निष्पाप मुलांच्या मृत्यूची धक्कादायक संख्या पुढे येत आहे. एका रिपोर्टनुसार एका महिन्यातच राजकोट आणि अहमदाबाद येथे १९६ निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे. राजकोटच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये मागील महिन्यात १११ मुलांचा मृत्यू झाला होता तर अहमदाबाद च्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ८५ मुलांचा मृत्यू झाला आहे.

राजकोट दवाखान्यातील सर्व मुले नवजात होती आणि १११ पैकी ९६ मुले प्री-मॅच्योर प्रसूतीमुळे मरण पावली आणि त्यांचे वजन सामान्य मुलांपेक्षा कमी होते. अशी माहिती समोर येत आहे की, हॉस्पिटलच्या एनआयसीयू मध्ये अडीच किलोपेक्षा कमी वजनाच्या मुलांना वाचविण्याची यंत्रणा आणि क्षमता नाही, त्यामुळेच अहमदाबादच्या रुग्णालयात ८५ मुलांच्या मृत्यूचा धोकादायक आकडा समोर आला आहे. असे सांगण्यात येत आहे.

गुजरात मधील मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या:

गुजरात मध्ये जवळपास १२३५ मुलांची मृत्यू झाल्याची संख्या समोर येत असून यामध्ये अहमदाबाद येथे २५३ मुलांचा मृत्यू झाला आहे.

राजकोट (२०१९ मधील संख्या) –

जानेवारी – १२२

फेब्रुवारी – १०५

मार्च – ८८

एप्रिल – ७७

में – ७८

जून – ८८

जुलै – ८४

ऑगस्ट – १००

सप्टेंबर – ११८

ऑक्टोंबर – १३१

नोव्हेंबर – ११०

डिसेंबर – १३४

अहमदाबाद (२०१९ मधील संख्या )

ऑक्टोंबर – ९४

नोव्हेंबर – ७४

डिसेंबर – ८५

विशेष म्हणजे राजस्थानच्या कोटाच्या जेके लोन हॉस्पिटलमध्ये अवघ्या ३६ दिवसांत ११० मुलांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि दुःख व्यक्त केलं. यापूर्वी लोकसभेचे सभापती ओम बिर्लाही पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी कोटा येथे गेले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/