अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत ‘कोसळली’, एकाचा ‘मृत्यू’ तर अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक तीन मजली इमारत पडून ढिगाऱ्याखाली दाबल्या जाऊन एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली बरीच माणसे अडकल्याची शक्यता आहे. ही दुर्घटना अमराईवाडी भागात घडली. या घटनेनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य सुरु आहे.

ही इमारत पडण्यामागचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार यात लोक गंभीर जखमी झाले आहे. स्थानिक लोकांच्या मते इमारत खूपच कमकुवत होती. त्या परिसरातील अनेक घरे देखील अत्यंत कमकुवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, जोपर्यंत मातीचा ठिगारा पूर्ण पणे बाजूला काढला जाणार नाही तोपर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढता येणार नाही. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ढिगारा बाजूला सारण्याचे काम सुरु आहे.