संतापजनक : महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली अन् मोबाइलवर व्हिडीओ बनवला

अहमदाबाद : वृत्तसंस्था – महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे समोर आली. पीडित महिला 22 वर्षीय आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तिघींविरोधात वाडज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींमधील एक महिला ही पीडितेच्या पूर्वीच्या प्रियकराची पत्नी आहे अशी माहिती समोर येत आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार ती चार वर्षापूर्वी नरनपुरामध्ये एका कपड्यांच्या दुकानात काम करत होती, तेथे गिरीश गोस्वामी आणि तिची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. या दोघांचे प्रेमसंबंध होते परंतु 2 वर्षांनंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर पीडित महिला वस्त्रपूरच्या एका कपड्याच्या दुकानात कामाला लागली. दोन महिन्यांपूर्वी महिलेला गिरीशचा पुन्हा फोन आला. त्यानंतर ते एकमेकांशी फोनवर बोलू लागले. एक महिन्यापूर्वी गिरीशची पत्नी जानू गोस्वामी हिला हे दोघे एकमेकांच्या पुन्हा संपर्कात आल्याची माहिती मिळली. त्यानंतर तिने पीडितेला फोन करुन धमकावले.

पीडिता गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारात वाडज येथील घरातून बाहेर पडली. ती प्रगतीनगरला जात होती, त्या दरम्यान जानू आणि तिची मैत्रीण रिंका गोस्वामी या दोघी स्कूटरवरुन आल्या. त्यांनी पीडितेला स्कूटरवर बसवले आणि जानूच्या घरी नेले. तेथे त्यांची आणखी एक मैत्रीण ठकुरी होती. तिघींनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. “ठकुरीने रिंका आणि जानूला कपडे काढून गुप्तांगात मिरची पावडर टाकण्यास सांगितले. त्यानंतर तिने माझ्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली, मी वेदनेने विव्हळले, त्यानंतर त्यांनी मोबाइलमध्ये माझा व्हिडिओ काढला”, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हणले आहे.

गिरीशच्या पत्नीने पीडितेला धमकावलं. तसेच 50 लाख रुपयांची मागणी केली. गिरीशने तिच्यावर लाख रुपये खर्च केले असा तिने आरोप केला. यशिवाय धमकावले की गिरीशला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला तर चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकू. त्यानंतर त्यांनी पीडितेला सोडून दिले. या प्रकरणी तिघींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक जे. ए. राठवा यांनी दिली.