5 महिलांसह 12 पोलीस कर्मचार्‍यांच्या घरात पकडली गेली वीज चोरी, SP ने घेतली अ‍ॅक्शन

अमरेली : गुजरातमधील अमरेली शहर पोलिसांनी आपल्याच दलातील 12 पोलीस कर्मचार्‍यांना घरात वीज चोरी करताना पकडले आहे. या पोलीस कर्मचार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे.

अमरेलीचे एसपी निर्लिप्त राय यांच्या बाबत म्हटले जाते की, ते गुन्हेगारांना सोडत नाहीत आणि पोलीसची वर्दी घालून नियमांचे पालन न करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवरही ते कडक कारवाई करतात.

एसपी निर्लिप्त राय यांच्या टीमने 12 पोलीस कर्मचार्‍यांना वीज चोरी करताना पकडले आणि त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईसुद्धा केली आहे. एसपी निर्लिप्त राय यांच्या टीमद्वारे पोलीस क्वार्टरमध्ये चेकिंग करण्यात आली होती. या चेकिंगदरम्यान अनेक पोलीस कर्मचार्‍यांना सरकारी घरात चोरी करताना पकडण्यात आले.

या प्रकारामुळे नाराज झालेले एसपी राय यांनी वीज चोरी करताना पकडले गेलेल्या 12 पोलीस कर्मचार्‍यांना निवासस्थान तोबडतोब खाली करण्याचे आदेश दिले आहेत. एसपींच्या या कारवाईने पोलीस दलात खबळब उडाली आहे.

वीज चोरी करणे गुन्हा आहे आणि जर सामान्य माणूस वीज चोरी करताना पकडला गेला तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाते, हे पोलीस कर्मचार्‍यांना माहित असूनही ते वीजचोरी करत होते.

एसपी निर्लिप्त रॉय यांनी 5 महिलांसह 12 पोलीस कर्मचार्‍यांविरूद्ध कारवाई करत ताबडतोब त्यांना पोलीस क्वार्टर खाली करण्याचे आदेश दिले आहेत.