‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊदचा पंटर माजीद कुट्टीच्या मुसक्या आवळल्या, गुजरात पोलिसांच्या ATS ची कारवाई

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या 24 वर्षापासून फरार असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Underworld don Dawood Ibrahim) पंटर माजीद कुट्टी (Majid Kutty) याच्या मुसक्या आवळण्यात गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) यश आले आहे. माजीद भारतात येताच ATS ने सापळा रचून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.

माजीद हा दाऊद इब्राहिमचा खास समजला जातो. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, 23 फेब्रुवारी 1996 रोजी मेहसाणा येथील दूधसागर डेअरीजवळील बॉम्बे गेस्ट हाऊसवर केलेल्या छापेमारीत आरडीएक्स (RDX) आणि मोठा शस्त्रसाठा सापडला होता. या छापेमारीनंतर माजीद फरार झाला होता. या छापेमारीत 4 किलो RDX, 115 पिस्टूल, 750 हून जास्त कार्ट्रिज, 10 डेटोनेटर जप्त केले होते. धक्कादायक म्हणजे जप्त केलेले पिस्टूल आणि बुलेट्स हे पाकिस्तानी बनावटीचे होते.

शस्त्रसाठा राजस्थानच्या बाडमेर आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आला होता. मुंबई आणि अहमदाबादेत हा शस्त्रसाठा पाठवला जाणार होता. मात्र, त्याआधीच ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर माजीद कुट्टी मलेशियाला पळून गेला होता. तो गेल्या 24 वर्षांपासून मलेशियातच होता. मात्र, माजीद पुन्हा भारतात येत असल्याची गोपनिय माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला केली.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गुजरात एटीएसनं दाऊदचा खास पंटर बाबू सोलंकी याला अटक केली होती. सोलंकी हा देखील गेल्या 14 वर्षांपासून फरार होता. त्याला दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जात होता.