Video : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना ‘कोरोना’ची लागण ! भाषण करतानाच स्टेजवर कोसळले

पोलिसनामा ऑनलाईन – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. सध्या त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी (दि 14) सायंकाळी एका कार्यक्रमात भाषण करत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते स्टेजवर कोसळले. 64 वर्षीय रुपाणी 2016 पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत.

विजय रूपाणी यांचा ब्लड प्रेशन कमी झाल्यानं त्यांना चक्कर आली होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यांना अहमदाबादमधील युएन मेहता रुग्णालयात नेलं जाणार आहे संही सांगण्यात आलं होतं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं विजय रुपाणी हे वडोदरा येथील नझीमपुरा परिसरात आयोजित एका रॅलीत सहभागी झाले होते. यावेळीच हा प्रकार घडल्याचं समोर आलं.