Gujarat CM | गुजरातचे नवे ‘CM’ कोण?, चंद्रकांत पाटील की नितीन पटेल? चर्चेला उधाण

गुजरात : वृत्तसंस्था – Gujarat CM | गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री विजय रुपाणी (Chief Minister Vijay Rupani) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. विजय रुपाणी यांनी आज (शनिवारी) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे सर्वत्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यांनतर आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा (Gujarat CM) नवा चेहरा कोण? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र, गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांच्यासह इतर 2 नावांचीही गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार असण्याची चर्चा रंगली आहे.

पुढील विधानसभा निवडणूक येत आहे. या पार्श्वभुमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) हे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. तसेच, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia), पुरुषोत्तम रुपाला (Purushottam Rupala) यांचीही नावे चर्चेत आहेत. परंतु, गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे भाजपचे वरचढ नेते असुन त्यांच्या नावाची अधिक चर्चा होताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवरच पाटील यांना पक्षसंघटनेची जबाबदारी सोपवली आहे.

 

चंद्रकांत पाटील-उपमुख्यमंत्री नितीन पटेल या दोघात रस्सीखेच…

चर्चेत असलेले नाव उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांचेही आहे. कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या पटेल यांचे भाजपात वजन आहे. देशात जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच संविधान, लोकशाही जिवंत असेल असे वादग्रस्त विधान त्यांनी मागील महिन्यात केले होते. भाजपचा अजेंडा पुढे नेणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. तसेच, आणखी एक नाव चर्चेत म्हणजे मनसुख मांडविया. 2021 मध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आरोग्य मंत्रीपदाची धुरा मनसुख मांडविया यांच्या हाती दिल्या आहेत. पंरतु, केंद्रातुन लगेच राज्यात येतील याची शक्यता कमीच आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा…
चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) हे 2019 मध्ये लोकसभेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले नेते आहेत.
2022 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाटील यांच्याकडे पक्षसंघटनेची जबाबदारी दिली होती.
मोदी यांचे गुजरातमधील सर्वात विश्वासू खासदार अशी त्यांची दिल्लीत ओळख आहे.
इतकेच नाही तर वाराणसी या मोदी यांच्या मतदारसंघावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.
सध्या ते खासदारांना देण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, 4 वर्षांपूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीआधी आनंदीबेन पटेल यांनाही अशाच पद्धतीने हटवून रुपाणी यांच्याकडे सूत्रे दिली होती.
आता कोणाकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Titel :- Gujarat CM | Who is the new CM of Gujarat ?, Chandrakant Patil or Nitin Patel? The discussion is over

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune BJP | घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले; महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’ ! (Video)

Earn Money | नशीब उजळू शकते, घरबसल्या कमावा ‘इतके’ लाख रुपये महीना; लवकर उचला ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

Earn Money | फायद्याची गोष्ट ! 110 रुपये खर्च करुन दरमहिना Bank Account मध्ये येतील ‘इतके’ हजार रुपये, जाणून घ्या