काँग्रेसला मोठा धक्का ! राज्यसभा निवडणुकीपुर्वी 4 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राज्यसभा निवडणुकीपूर्वीच गुजरात कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. गुजरात कॉंग्रेसच्या ४ आमदारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राजीनामा दिलेल्या आमदारांची अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. या चारही आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. विधानसभा अध्यक्ष उद्या या आमदारांची नावे उघडकीस आणतील.

दरम्यान, माहितीनुसार, राजीनामा देणाऱ्या ४ आमदारांपैकी जे.व्ही. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन होण्याची शक्यता आहे. कारण निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे हे दोन्ही आमदार गायब असून पक्षाच्या संपर्कात येत नाहीयेत. याशिवाय राजीनामा देणाऱ्या कॉंग्रेसच्या आमदारांमध्ये मंगल गावित आणि प्रद्युम्नसिंग जडेजा यांची नावे असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील राजकीय भूकंपाच्या दरम्यान राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने गुजरातमध्ये खबरदारीचा पाऊल उचलण्यास सुरवात केली. शनिवारी कॉंग्रेसने आपले १४ आमदार गुजरातमधून जयपूर येथे हलविले. गुजरातचे हे आमदार जयपूरच्या पंचतारांकित हॉटेल शिवविलास येथे मुक्कामी आहेत. आता या ४ आमदारांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस आपल्या २०-२२ आमदारांना जयपूरमध्ये घेऊन जाईल. माहितीनुसार, राजीनामा दिलेल्या या ४ आमदारांसह काँग्रेसचे १० ते १२ कॉंग्रेसचे राजीनामा देऊ शकतात. यापूर्वी मध्य प्रदेशातील कॉंग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे.