‘कथाकार’ मोरारी बापू यांना ठार मारण्यासाठी सरसावले BJP नेता ‘पबुभा माणेक’, ‘या’ खासदारानं वाचवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगप्रसिद्ध कथाकार मोरारी बापू त्यावेळी स्तब्ध झाले, जेव्हा भाजपाने माजी आमदार पबुभा माणेक यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जसे भाजपाचे नेते बापूंना ठार मारण्यासाठी पुढे सरसावले तेव्हाच खासदार पूनम मादामने त्यांना थांबविले. पण असे असूनही माणेकने मोरारी बापूंना शिवीगाळ केली.

ही घटना द्वारकाची आहे, जेथे दर्शन घेतल्यानंतर भाजपा नेत्यांसमवेत मोरारी बापू भेट घेत होते. ही घटना त्याच वेळी घडली. खरं तर काही दिवसांपूर्वी यूपीमधील एका कथेदरम्यान मोरारी बापूंनी भगवान श्रीकृष्णाबद्दल एक विधान केलं होतं. श्रीकृष्णाच्या वंशजांवर त्यांनी आक्षेपार्ह भाष्य केले आणि त्यांचे भाऊ बलराम यांना मद्यपी म्हटले होते. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अहिर समाजात प्रचंड संताप व्यक्त झाला. ही माहिती मिळताच मोरारी बापूंनी आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आणि सर्व श्रीकृष्ण भक्तांची क्षमा मागितली. परंतु गुरुवारी मोरारी बापूंच्या टीकेवर भाजप नेते पबुभा यांनी मोरारी बापूंवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. असं म्हटलं जात आहे की मोरारी बापूंनी ज्या विधानामुळं माफी मागितली आहे, त्या संबंधातच ते भाजपा नेत्यांना भेटण्यासाठी द्वारका येथे गेले होते. खासदार पूनम मादाम यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते तेथे उपस्थित होते. त्याचवेळी अचानक भाजपा नेते आणि माजी आमदार पबुभा माणेक यांनी ही घटना घडवून आणली.