Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Gujarat Election results) लागला असून, यावेळेसही गुजरात भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले. भाजपचा गुजरातमधील हा सातवा विजय आहे. २७ वर्षे सलग भाजप गुजरातमध्ये सत्तेवर आहे. यावेळी भाजपने अनपेक्षित विजय मिळवला असून, तीन चतुर्थांश जागांवर त्यांचा झेंडा फडकवला आहे. म्हणजे एकूण १८२ जागांपैकी १५६ जागा भाजपने जिंकल्या आहेत. या निकालानंतर (Gujarat Election results) आता राजकीय स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनीसुद्धा भाजपला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आदित्य ठाकरेंनी भाजपला शुभेच्छा देण्याबरोबर आव्हानही दिले आहे. ते म्हणतात, “हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेचा निकाल लागला. आता महाराष्ट्रात निवडणुका लावा, घाबरायची काय गरज आहे? मुंबईसह अनेक पालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. एकदा लोकशाही पद्धतीने होऊन जाऊ द्या. जे विजयी झाले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.”

 

ठाकरे बोलतात, “राज्यातील निवडणुकांची आता वेळ आली आहे.
महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार बसले आहे.
40 आमदार, 12 खासदारांच्या निवडणुका व्हायला हव्या होत्या, त्या अजून झालेल्या नाहीत.
आता एवढा मोठा विजय प्राप्त झाल्यावर महाराष्ट्रातील निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही.”

 

Web Title :- Gujarat Election results | gujarat assembly election 2022 shiv sena chief uddhav thackeray congratulates bjp for gujarat victory wishes congress for himachal victory

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा