Gujarat Elections Result | ‘महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही या विजयात फळले असावेत’; गुजरात निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या भाजपला शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Gujarat Elections Result) लागला असून, यावेळेसही गुजरात भाजपकडे जाणार, हे स्पष्ट झाले आहे. भाजपचा गुजरातमधील हा सातवा विजय आहे. २७ वर्षे सलग भाजप गुजरातमध्ये सत्तेवर आहे. या निकालानंतर (Gujarat Elections Result) आता राजकीय स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा त्यांच्या खास शैलीत भाजपला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

या विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ‘गुजरातमधील विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे,’ असे म्हणत ठाकरे यांनी भाजपचे अभिनंदन केले आहे, पण शुभेच्छा देताना त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. (Gujarat Elections Result)

ठाकरे म्हणतात, “गुजरातचा असा निकाल अपेक्षितच होता. पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली गुजरात निवडणूक लढवण्यात आली.
त्यामुळेच भाजपला जनतेने भरघोस मतदान केले. महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही या विजयात फळले असावेत,
असे दिसते. 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील.
आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला, हेदेखील स्पष्ट झाले आहे.
असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते.”

 

Web Title :- Gujarat Elections Result | gujarat assembly election 2022 shiv sena chief uddhav thackeray congratulates bjp for gujarat victory wishes congress for himachal victory

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘तू माझ्या मित्राचा मर्डर केला, तुझी विकेटच पाडतो’ म्हणत तरुणावर हल्ला; हडपसर परिसरातील घटना

Driving Licence lost | ड्रायविंग लायसन्स हरवलंय? चिंता नको ‘हे’ करा

CM Eknath Shinde | गुजरात विधानसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या