गुजरात : अहमदाबादच्या कोविड-19 हॉस्पीटलमध्ये भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका हॉस्पीटलमध्ये लागलेल्या आगीत किमान 8 लोक मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार ही आग नवरंगपुरा परिसरातील हॉस्पीटलमध्ये लागली होती. या हॉस्पीटलमध्ये कोरोना रूग्णांवर सुद्धा उपचार सुरू आहेत. घटनेनंतर सुमारे 35 रूग्णांना दुसर्‍या हॉस्पीटीलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

ही आग कशी लागली, याबाबतची माहिती अद्याप मिळलेली नाही. असे सांगितले जात आहे की, आयसीयूमध्ये आग लागली होती. एका अधिकार्‍याने सांगितले की, सुमारे साडेतीन वाजता आग लागली. दुर्घटनेत आयसीयू वॉर्डमध्ये असलेल्या पाच पुरूष आणि तीन महिला रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद अग्निशमन विभागाच्या एका अधिकार्‍याने म्हटले की, आग लागल्यामुळे श्रेय हॉस्पीटलच्या आयसीयू वार्डात असलेल्या कोरोना व्हायरसच्या आठ रूग्णांचा मृत्यू झाला. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अहमदाबादच्या घटनेवर निराशा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अहमदाबादच्या हॉस्पीटलमधील वेदनादायक घटनेने निराश आहे. मृतांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. जखमी लोक लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना. मी सीएम आणि महापौरांशी चर्चा केली, आणि स्थितीची माहिती घेतली आहे. प्रशासन सर्व सहकार्य उपलब्ध करून देत आहे.

गुजरातमध्ये कोरोना संक्रमणाची एकुण प्रकरणे 66 हजारच्या पुढे गेली आहेत. सोबतच गुजरातमध्ये कोरोनाने मरणार्‍यांची संख्यासुद्धा 2,557 झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकुण 66,777 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. अहमदाबाद जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळपर्यंत कोरोना व्हायरसची एकुण प्रकरणे 27,283 झाली आहेत. अहमदाबाद सध्या होणार्‍या कोरोना मृत्यूंमुळे जास्त चर्चेत आहेत. येथे आतापर्यंत 1,617 लोकांचा मृत्यू झाला आहे.