वर्‍हाडी टेम्पोला ट्रकची समोरासमोर धडक, 11 जणांचा मृत्यू

गुजरात  : वृत्त संस्था – रानू आणि महुवाडला जोडणाऱ्या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला. टेम्पो व ट्रकची समोरासमोर धडक होऊन ११ जण मृत्युमुखी पडले आहेत. आणि अनेक जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना गुजरात राज्यातील बडोदा जिल्ह्यातील आहे.

अपघातग्रस्त टेम्पोमध्ये वऱ्हाडी होते आणि ते वरातीसाठी निघाले होते,पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. वऱ्हांड्यानी भरलेला टेम्पो पादरा तहसील येथील रानू आणि महुवाड दरम्यान पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी गंभीर होती की टेम्पोचा अक्षरशा चुराडा झाला. घटना घडताच लोकांनी पोलिसांना कळवले आणि नंतर बचावकार्याला सुरुवात झाली.