वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने समलिंगी संबंधासाठी दबाव टाकल्याने पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

गुजरात ( गांधी नगर ) वृत्तसंस्था – पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह राठौड यांनी काल मंगळवारी १ जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लावलेल्या गंभीर आरोपाने हे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. प्रशिक्षणाच्या कार्यावर असणारे देवेंद्र सिंह राठौड यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी असणारे जिल्हा पोलीस उपाधीक्षक एन.पी.पटेल यांनी समलिंगी संबंधासाठी मागणी केली होती त्यांनी यासाठी दबाव वाढवल्याने देवेंद्र सिंह राठौड यांनी गांधी नगर येथील राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.

मयत देवेंद्र सिंह राठौड यांच्या पत्नी डिंपल यांनी सांगितले कि, आपल्या पतीचे वरिष्ठ अधिकारी असणारे पोलीस उपाधीक्षक एन.पी.पटेल यांनी आपल्या नवऱ्यावर समलिंगी संबंधासाठी दबाव टाकला त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. असा दावा करत, या प्रकरणात आरोपीला अटक झाल्या शिवाय आपल्या नवऱ्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत असा पवित्रा घेतला होता. आपला नवरा सतत तणावात असायचा त्याच्या तणावात राहण्याने घरात वातावरण दूषित असायचे. एक दिवशी मी तणावाचे कारण विचारले असता त्यांनी मला सांगण्यास नकार दिला पण मी जेव्हा आमच्या मुलीची शपत घातली तेव्हा त्यांनी मला हा सर्व प्रकार सांगितला असे मयत राठौड यांच्या पत्नी डिंपल म्हणले आहे. आपल्या नवऱ्याच्या आत्महत्येचा न्याय झाला पाहिजे आपण आपले गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगणार आहे. जर या आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही तर आपण हि आत्महत्या करणार आहोत असे मयत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने म्हणले आहे.

देवेंद्र सिंह राठौड यांनी आत्महत्या केलेल्या स्थळी एक सुसाइड नोट्स मिळाली असून त्यात पोलीस उपाधीक्षक एन.पी.पटेल यांनी केलेल्या जुलमाची कबुली दिली आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे कि, माझे वरिष्ठ अधिकारी पटेल हे माझ्यावर जुलूम करतात, मानसिक त्रास देतात. अनैतिक गोष्टीची मागणी करतात त्यांच्या दबावामुळे मी प्रचंड तणावात असल्याने मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यू नंतर पटेल यांना जन्मठेप देण्यात यावी असे या नोट्स मध्ये म्हणले आहे. परंतु या चिठ्ठीत कुठेही समलिंगी संबंधासाठी मागणीचा उल्लेख करण्यात आला नाही. तर संबंधित पोलीस उपाधीक्षकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.