‘हेल्मेट’ न घालता खुलेआम गाडी चालवतो ‘हा’ चालक, तरीही पोलीस नाही करत दंड, जाणून घ्या

गुजरात : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सध्या नवीन वाहन कायद्याला स्थगिती दिली गेली आहे. मात्र नवीन मोटार वाहन कायदा अस्तित्वात आल्यापासून, सीट बेल्ट नसलेल्या आणि हेल्मेट ना घालता बाईक चालविणाऱ्या लोकांकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पावत्या कापल्या गेल्या आहेत. त्यामुळे सुरक्षिततेसाठी नाही मात्र दंडाच्या भीतीने तरी लोकांनी हेल्मेट घालणे सुरू केले आहे. पण गुजरातमध्ये हेल्मेटवरील दंडाच्या संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्याबद्दल जाणून घेऊन आपल्याला आश्चर्य वाटेल.

असे आहे कारण :
वास्तविक, छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोदेली शहरात राहणारा झाकीर मेमन हा पोलिसांना हेल्मेटशिवाय वाहन चालविताना पकडला गेला, पण झाकीरने आपला नाईलाज सांगितल्यावर पोलिसांनाही नेमकं काय करावं असा प्रश्न पडला. मीडिया रिपोर्टनुसार, झाकीरकडे हेल्मेटशिवाय गाडीशी संबंधित सर्व कागदपत्रे होती. जेव्हा पोलिसांनी झाकीरला हा दंड भरण्यास सांगितले तेव्हा त्याने सांगितले की तो हेल्मेट घालू शकत नाही, कारण बाजारातील कोणतेही हेल्मेट त्याच्या डोक्यात येत नाही.

झाकीरने पोलिसांना सांगितले की त्याने शहरातील जवळपास सर्व दुकाने पाहिली आहेत, परंतु त्याच्या डोक्यानुसार कोणतेही हेल्मेट सापडले नाही. तो म्हणतो की तो कायद्याचा खूप आदर करतो, पण तो असहाय्य आहे. त्याचबरोबर रहदारी पोलिसांचे म्हणणे आहे की झाकीरच्या या समस्येला पाहता त्याचे चलन फाडले जात नाही, कारण तो कायद्याचा आदर करतो. त्याच्याकडे सर्व वैध कागदपत्रे आहेत, परंतु हेल्मेट मात्र तो वापरू शकत नाही.