PM मोदींच्या गुजरातमध्ये ‘विना’ हेल्मेट वाहन चालवल्यास नाही लागणार ‘दंड’, सरकारनं दिली ‘ही’ सुट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : गुजरात च्या बर्‍याच शहरांमध्ये दुचाकी हेल्मेट शिवाय चालविली तरीही दंड आकारला जाणार नाही. तसेच विशेष म्हणजे गुजरात सरकारने तीन जणांना दुचाकी किंवा स्कूटरवर बसण्याची परवानगी देखील दिली आहे. यानंतर, राज्य सरकारने यावर्षी सप्टेंबरमध्ये अंमलात आलेल्या केंद्राच्या मोटार वाहन कायद्याचा अवमान केला.

यापूर्वी राज्य सरकारने एमव्ही अ‍ॅक्ट २०१९ मध्ये लागू केलेल्या शिक्षेची रक्कम कमी केली. शासनाने ही सूट प्रामुख्याने दुचाकी वाहनांना व शेतीच्या कामात गुंतलेल्या वाहनांना दिली होती. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले होते, ‘आम्ही यामध्ये नवीन नियमांच्या कलम ५० मध्ये बदल केले आहेत. यामध्ये दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे नवीन नियम १६ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.

शहरी भागात हेल्मेट आणि दुचाकीवर तीन जणांना बसण्याची परवानगी देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे कारण बर्‍याच ठिकाणाहून पोलिस आणि सामान्य लोकांमध्ये चकमकी झाल्याचे वृत्त आहे.

एमव्ही अ‍ॅक्टमध्ये हेल्मेट न घालण्याऱ्यांसाठी नव्या नियमावलीनुसार १००० रुपये दंड आहे, पण गुजरातमध्ये ते बदलून ५०० रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर सीट बेल्ट न लावल्याबद्दल नवीन नियमांतर्गत १००० रुपये दंड करण्याची तरतूद आहे. गुजरातमध्ये ते ५०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे.

वाहन चालविण्याचा परवाना नसताना देखील वाहन चालविताना आढळून आल्यास नवीन नियमांतर्गत ५००० रुपये दंड भरावा लागतो. परंतु गुजरातमध्ये दुचाकी चालकांना २ हजार रुपये आणि उर्वरित वाहनांना ३००० रुपये दंड भरावा लागतो. ट्रिपल राईडिंगच्या नवीन नियमानुसार १००० दंड आकारला जातो, परंतु गुजरातमध्ये फक्त १०० रुपये दंड भरावा लागतो.

नव्या नियमानुसार धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यास ५००० रुपये दंड भरावा लागतो तर गुजरातमध्ये तीन चाकी वाहनास १५००, एलएमव्ही ३००० आणि उर्वरित ५००० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार ओव्हर-स्पीडिंगला २००० रुपये दंड भरावा लागतो, परंतु गुजरातमध्ये तो १५०० रुपये आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like