पोलिसांनी भूताविरूद्ध दाखल केली तक्रार, धापा टाकत जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात आला व्यक्ती; जाणून घ्या प्रकरण

अहमदाबाद : वृत्त संस्था – gujarat police files case|गुजरात (Gujarat) च्या पंचमहल जिल्ह्या (Panchmahal District)तून हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे, येथे पोलिसांनी दोन भूतांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पंचमहल जिल्ह्यातील जंबूघोड़ा पोलीस स्टेशन (Police Station Jambughoda) मध्ये रविवारी एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. (gujarat police files case) तक्रारीनुसार, शेतात काम करताना त्याचा भूतांच्या गँगशी सामना झाला आणि भूतांनी त्यास मारण्याची धमकी दिली.gujarat police files case against two ghosts in jambughoda taluka

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

टीओआय (Toi) च्या वृत्तानुसार, 35 वर्षाच्या ही व्यक्ती पंचमहलच्या जंबुघोड़ा तालुक्यातील राहणारी आहे. तो शेतातून पळून पोलिसांकडे आला आणि त्याने आपला जीव वाचवण्याची विनंती केली. या अजब विनंतीनंतर सुद्धा पोलिसांनी त्या व्यक्तीला संकटातून वाचवण्यासाठी योग्य दया दाखवली आणि त्याचे म्हणणे ऐकले. तक्रार करताना पीडित व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटत होता.

बातमीनुसार, पोलीस ठाण्यात जेव्हा व्यक्ती पोहचला तेव्हा तो खुप घाबरलेला होता आणि तो थरथरत होता. पोलीस उप-निरीक्षकांना लिहिलेल्या आपल्या तक्रारीत व्यक्तीने म्हटले की, जेव्हा तो शेतात काम करत होता तेव्हा भूतांची एक गँग त्याच्याजवळ आली होती.

रविवारी पावागढमध्ये ड्युटीवर तैनात पीएसआय मयंकसिंह ठाकोर यांनी सांगितले की, तो खुप अस्वस्थ होता. तो असामान्य वागत होता आणि खुप घाबरला होता. त्यास शांत आणि नॉर्मल करण्यासाठी त्याची लेखी तक्रार घेतली.

दरम्यान, पोलिसांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांशी सुद्धा संपर्क साधला.
कुटुंबीयांनी सांगितले की, त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू आहेत.
त्याने मागील 10 दिवसात आपले औषध घेतल नव्हते.
जेव्हा पोलिसांनी सोमवारी त्यास चर्चा केली तेव्हा त्याने सांगितले की,
तो पोलीस ठाण्यात यासाठी आला कारण येथे भूत येण्याची हिम्मत करणार नाही आणि त्याला त्रास देणार नाही.
पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना त्यास नियमित औषध देण्यास सांगितले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : gujarat police files case against two ghosts in jambughoda taluka

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर