‘विवादित’ गुरू स्वामी नित्यानंदच्या आश्रमातील 2 संचालिका प्राणप्रिया आणि तत्वप्रिया ‘अडचणीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वामी नित्यानंद यांच्या अहमदाबाद येथील आश्रमाची देखरेख करणाऱ्या दोन संचालिकांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. प्राणप्रिया आणि तत्वप्रिया असे अटक केलेल्या संचालिकांची नावे आहेत. आश्रमातून वाचवलेल्या मुलींनी दिलेल्या माहितीनुसार हे अटक सत्र सुरु करण्यात आले होते. दोनीही मुलींनी पोलिसांना सांगितले होते की, या दोनीही शिष्या त्यांना मारहाण करत आणि देणगीची टॉर्चर देखील करत असत.

आणखी दोन मुलांना वाचवले
पोलिसांनी दोन मुलींसह आणखी दोन मुलांना देखील वाचवले आहे. त्यानंतर चारही मुलांनी सांगितलेली माहिती एकसारखी असल्याने पोलिसांनी कारवाई करत आश्रमातील दोन शिष्यानं ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे यासंबंधी नित्यानंद यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली गेली आहे.

नित्यानंद यांच्या भूमिकेची तपासणी
नित्यानंद याबाबत काय भूमिका आहे याचीदेखील पोलीस तपासणी करत आहेत. आश्रमाकडून मुलांचा वापर डोनेशन गोळा करण्यासाठी देखील केला जात होता. त्याचप्रमाणे आश्रम सोशल मीडियावर पोस्ट करण्याबाबत देखील सल्ला देत होता त्यामुळे पोलीस याचा देखील तपास करत आहेत. नित्यानंद आश्रमात या सर्व मुलांना कैद केले जात होते. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या दोन शिष्यांकडून या आश्रमाची चावी देखील मिळाली आहे.

40 मुलांचा जबाब नोंदवला
या दोघांनीही मुलांनी मारहाण केली जात असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. तसेच पोलिसांनी आश्रमातील 40 वेगवेगळ्या मुलांचे जबाब नोंदवले आहेत. एवढेच नाही तर आश्रमात संलग्न असलेल्या भाविकांनाही देणगीचे लक्ष्य केले जात असल्याची बाबा समोर आली आहे.

दोन आश्रम शिष्यांच्या अटकेपूर्वी एका माजी साधकाने आपल्या दोन मुलींना ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात हबीस कॉर्पस याचिका दाखल केली होती, त्यावर आज सुनावणी होणार आहे.तक्रार दिलेल्या जनार्दन शर्मा यांच्या मुलीने फेसबुकवरून सांगितले होते की ती या विरोधात कोठेही येऊन जबाब देण्यास तयार आहे. तसेच आपले वडील नित्यानंद यांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करू इच्चीत असल्याचे देखील मुलीने सांगितले.

Visit : Policenama.com