क्रॉस वोटिंगनंतर ‘या’ काँग्रेस आमदाराने दिला राजीनामा ; म्हणाला, राहुल गांधींनी दिला धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर धक्के बसत असलेल्या काँग्रेसला गुजरातमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. चार दिवसांपूर्वी कर्नाटकमधील आमदाराने पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुजरातमधील काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करत आमदारकीचा राजीनामा दिला. आज गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत काँग्रेसने व्हीप जारी केल्यानंतर देखील त्यांनी क्रॉस वोटिंग करत भाजप उमेदवाराला मतदान केले. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आणि काँग्रेस आमदार धवन झाला यांनी देखील क्रॉस वोटिंग केले. या मतदानानंतर ठाकोर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

राजीनामा दिल्यानंतर अल्पेश यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले कि, मी राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांनी आमच्यासाठी काहीही केले नाही. काँग्रेस जनाधार गमावून बसला आहे. प्रत्येक वेळी आम्हाला बेइज्जत केले जाते. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा दिला असून काँग्रेस देखील सोडली आहे. मतदान केल्यानंतर सांगितलं कि, मी माझ्या अंतरआत्म्याचा आवाज ऐकून निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या पक्षाने आमच्यासाठी काहीही केलेले नाही त्यांच्याविरोधात मतदान केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मोठ्या राज्यात काँग्रेस आमदार राजीनामा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे.
https://twitter.com/ANI/status/1147081558010073088

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?