Gujarat Riots 2002 | ‘गुजरात दंगलीतल्या आरोपींना निर्दोष सोडणं ही संविधानाची हत्या’, शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोध्रा जळीतकांडानंतर 2002 मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये (Gujarat Riots 2002) नरोडा पाटिया गावातील मुस्लिमांची घरे पेटवून दिली होती. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात (Gujarat Riots 2002) भाजपच्या माजी आमदार माया कोडनानी (Former BJP MLA Maya Kodnani), बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी (Bajrang Dal Leader Babu Bajrangi), विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल (Vishwa Hindu Parishad Leader Jaideep Patel) हे मुख्य आरोपी होते. त्यांच्यासह 69 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या सर्वांची विशेष न्यायालयाने (Special Court) निर्दोष मुक्तता केली आहे.

 

या प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे. गुजरात दंगलीत (Gujarat Riots 2002) ज्यांची हत्या झाली, त्यांची हत्या तर झालीच. मात्र कालच्या निर्णयामुळे देशात संविधानाचीही (Constitution) हत्या झाली, असं विधान शरद पवारांनी केलं. ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

नरोडा हत्याकांड प्रकरणात (Naroda Massacre Case) न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले, देशात दररोज काहीतरी घडतंय. आज एक बातमी आली की, काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या. हल्ले झाले. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला. ही जातीय दंगल होती. या जातीय दंगलीमागे गुजरातमधील सत्ताधारी पक्ष होता. यामध्ये अनेकांना अटक झाली. हे प्रकरण अनेक दिवस चाललं.

 

मात्र, या प्रकरणात ज्यांना अटक झाली, त्यांना लगेच जामीन देण्यात आला. हा खटला वर्षानुवर्षे चालला.
यानंतर काल उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि सगळ्यांना निर्दोष सोडलं.
मग त्यावेळी ज्या लोकांच्या हत्या झाल्या? त्या हत्या कशा झाल्या? जर कुणी हल्लाच केला नसेल,
तर हत्या कशा होतील? ज्यांची हत्या झाली त्यांची हत्या तर झालीच.
पण एका दृष्टीने या देशात जो कायदा आहे. जी कायद्याची व्यवस्था आहे.
त्या कायदा आणि संविधानाची हत्या झाली हे कालच्या निकालावरून स्पष्ट झाल्याचे शरद पवारांनी म्हटलं.

 

Web Title :- Gujarat Riots 2002 | ncp chief sharad pawar on gujarat riots 2022 and special court verdict on naroda gam massacre case modi govt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | अत्याधुनिक तंत्रज्ञानातून पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरवाव्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune RTO News | उबेरसह चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले

Chandrashekhar Bawankule | ‘महाविकास आघाडीतील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत’ – चंद्रशेखर बावनकुळे (व्हिडिओ)