गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांवरील ‘ती’ कविता, गुजरात साहित्य अकादमीने म्हटले – ’साहित्यिक नक्षल’

अहमदाबाद : वृत्तसंस्थाकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत Corona second wave मन अस्वस्थ करणार्‍या अनेक बातम्या News ऐकायला आणि पहायला मिळाल्या होत्या. गंगेत सोडण्यात आलेल्या शेकडो मृतदेहांची ती घटना तर हृदय पिळवटून टाकणारी ठरली. देशालाच नव्हे तर जगाला या घटनेने हादरवले. गुजरातमध्ये Gujarat कवयित्री पारुल खाखर Parul Khakhar यांनी त्या विचलित करणार्‍या घटनांवर एक कविता लिहिली होती, तिची खुप चर्चा सुद्धा झाली. परंतु आता त्याच कवितेवरून गुजरातमध्ये Gujarat गोंधळ सुरू झाला आहे. राज्य सरकारच्या गुजरात साहित्य अकादमीने Gujarat Sahitya Akademi  त्यास साहित्यिक नक्षल ठरवले आहे. अकादमीने म्हटले आहे की अशा कवितांद्वारे अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे.

साहित्य अकादमीने आपल्या संपादकीयद्वारे त्या कवितेवर जोरदार निशाणा साधला आहे.
एकदाही लेखात कुठेही शव वाहिनी गंगाचा ganga उल्लेख केलेला नाही,
परंतु इशारा तिकडेच आहे. लेखात स्पष्ट लिहिले आहे की, ही कविता नाही, तर अराजक पसरवण्याचे काम होत आहे.
जोर देऊन म्हटले आहे की, चर्चेत असलेली कविता कोणत्याही अँगलने काव्य नाही,
हा केवळ वर्थ आक्रोश आहे, जिथे भारतीय जनता, लोकशाही Democracy आणि समाजावर आरोप करण्याचे काम केले आहे.

कवितेद्वारे अराजकता ?
संपादकीयमध्ये पुढे म्हटले आहे की, या कवितेमध्ये ज्या प्रकारच्या शब्दांचा Words वापर केला आहे,
ते कोणत्याही काव्याला शोभत नाहीत.
असे विचार केवळ देशात केंद्रविरोधी विचारधारेच्या विरोधात पहायला मिळतात.
लेखानुसार असेच विचार साहित्यिक नक्षलींमध्ये दिसून येतात.

गुजरात साहित्य अकादमीने आपल्याकडून स्पष्ट केले आहे की, ते अशा कोणत्याही कवितेला काव्य मानत नाहीत आणि ते या कवितांद्वारे प्रचार केला जात असलेल्या विचारांशी सहमत नाहीत. अशावेळी कवितेवरून राज्यातील राजकारण खुपच तापले आहे.

प्रश्न तर हा सुद्धा उपस्थित केला जात आहे की, एका कवितेला अराजकाता पसरवणारे साहित्य म्हणता येईल का? मात्र, यावर सध्या जास्त स्पष्टपणे बोलता येणार नाही. कारण कवयित्री पारुल खाखर यांनी सुद्धा या वादावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’