हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून 7 जणांचा मृत्यू

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातमधील व़डोदरा येथील फर्टीकुई गावात भीषण अपघात झाला आहे. या गावातील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हॉटेलच्या चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या वृत्तानुसार, अजय वसावा (२४ वर्ष), विजय चौहान (२२ वर्ष), सहदेव वसावा (२२ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. अन्य 4 जणांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरु आहे. घडलेली घटना अधिक गंभीर असून यात तरूण वर्ग दिसून येत आहे. याप्रकणी पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतलं आहे. मात्र हॉटेल मालकाविरोधात अटकेची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

सध्या पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. तसंच ही घटना कशी घडली, यातील इतर चौघांची ओळख याचा तपास पोलीस करत आहे. मात्र एकाच वेळी ७ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक घाबरले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील ठाणे येथेही ९ जून ला अशीच घटना घडली होती. सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टॅंकमध्ये एकूण ८ कामगार अडकले होते. यातील ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर अन्य पाच जणांची प्रकृती खालावली होती. या घटनेतील मृतामध्येही २५ वर्षाच्या खालील युवकांचा समावेश होता.

आरोग्य विषयक वृत्त –

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल