बडोद्यात 3 मजली इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – गुजरातमधील बडोदे येथे काम सुरू असलेली तीन मजली इमारत काल मध्यरात्री कोसळून झालेल्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे.

बडोद्यातील बावानानपूरा येथील मध्यरात्रीच्या सुमारास काम सुरू होते. त्यावेळी तीन मजली इमारत कोसळली. सर्वप्रथम ही इमारत एका बाजूला झुकली होती. लोकांनी याबाबत त्याची तक्रारही केली. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सोमवारी रात्री अचानक ही इमारत कोसळल्याने त्यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाताच बचावकार्यासाठी सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सध्या या इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिनाभरापूर्वीही अहमदाबादमध्ये एक व्यावसायिक इमारत कोसळली होती. त्यामध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.