बालसुधारगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, दोन मुलींवर FIR

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलगी मनोरुग्ण असल्याने पॉस्को न्यायालयात ती साक्ष देऊ शकली नसल्याने दोन्ही मुलींना सोडून देण्यात आले. हा प्रकार अहमदाबादच्या ओढव येथील महिला शेल्टर होमधील बालसुधारगृहात जून 2017 मध्ये घडला होता.

एका मुलीने 22 जून 2017 मध्ये बालसुधारगृह अधीक्षकांकडे तक्रार केली होती. तिच्या सोबत असलेल्या तीन मुली कपडे बदलत असताना तिची छेड काढतात, असा आरोप तिने केला होता. आरोपी मुली या गुप्तांगाला स्पर्श करत असल्याचाही आरोप तिनं केला होता. आरोपी मुलींनी यापूर्वी अनेकवेळा आपली छेड काढली होती तसेच याच प्रकरणाची कोठेही वाच्चता करु नकोस असे सांगितल्याचे पीडित मुलीने अधीक्षकांना सांगितले होते.

बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून महिला पोलीस ठाण्यात तीन मुलींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार करण्यात आली त्यावेळी या तीनही मुली 17 वर्षाच्यां होत्या. पोलिसांनी त्यांच्याविरोधात पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून एका मुलीला वडोदरा येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले. तर दोघीपैकी एकीला जामीन मिळाला तर दुसरीला मिळू शकला नाही. या मुलीवर यापूर्वी लैंगिक शोषणाच्या तक्रारी होत्या.

पीडित मुलगी स्किट्सफ्रीनियाने ग्रस्त
आरोपी दोन्ही मुलींना पॉस्को न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पीडित मुलगी स्किट्सफ्रीनियाने आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले. रुग्णाला वास्तवात नसलेल्या गोष्टी दूसू लगातात. त्यामुळे पिडितेचा जबाब कलम 164 अंतर्गत न्यायाधिशांसमोर नोंदवण्यात आला. सुनावणीच्यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी पिडिता मानसिक आजारी असून तिला स्किट्सफ्रीनियाचे झटके येत असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे तिला मनोरुग्णालयात भर्ती केले पाहिजे. सुनावणी नंतर दोन्ही आरोपींची सुटका करण्यात आली. हा निकाल देताना न्यायालयाने पीडित मुलगी मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने तिचा जबाब व्यवस्थत नोंदवू शकत नाही असे स्पष्ट केलं.

फेसबुक पेज लाईक करा