32 गायकांच्या आवाजात गाणारे गायक महेश कनोडिया यांचं निधन, PM मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजराती (gujrat) फिल्म (film) संगीतकार (composer) आणि गायक (singer) महेश कनोडिया (mahesh kanodia) यांचं निधन (passed away) झालं आहे. ते 83 वर्षांचे हेते. महेश कनोडिया हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.

महेश कनोडिया यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महेश कनोडिया यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालं. ते एक बहुमुखी प्रतिभासंपन्न गायक होते. त्यांच्यावर लोकांनी भरपूर प्रेम केलं. एक राजकीय नेता म्हणून देखील गरीब आणि मागास लोकांना सशक्त करण्याचं काम त्यांनी केलं. हितु कनोडिया यांच्याशी मी बोलून त्यांच्या परिवराप्रती संवेदना व्यक्त केली.

महेश कनोडिया भाजपचे सदस्य होते. त्यांनी पाटन मतदारसंघाचं अनेक वेळा लोकप्रतिनिधीत्व केलं आहे. कनोडिया हे लोकप्रिय गायक होते. ते 32 गायकांच्या आवाजात गायचे. विशेष म्हणजे यात महिला गायकांचाही समावेश होता. त्यामुळे लोकांनी त्यांच्या आवाजावर आणि त्यांच्यावर भरपूर प्रेम केलं.