पश्चिम बंगालमध्ये नेमणार ‘गुजराती’ राज्यपाल, ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ममता बॅनर्जी आणि भाजपात वाद सुरु असताना केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये आता थेट गुजराती राज्यपाल नेमण्याची तयारी सुरु केली आहे. सध्याचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपणार आहे. या आधी भाजपने नवा राज्यपाल बसण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी अमित शाह 3-4 जुलैला गुजरातला पोहचणार आहेत.

गृहमंत्री झाल्यानंतर आता बंगाल काबीज करण्यासाठी अमित शाह रणनिती आखत आहेत, त्यासाठीच पश्चिम बंगालसाठी नव्या राज्यपालाच्या ते शोधात आहेत. नवा राज्यपाल गुजरातचा असावा. अशी रणनिती ते आखत आहेत. त्यासाठी ते गुजरातमध्ये आपल्या विश्वासूंची भेट घेणार आहेत. याचवेळी ती राज्यसभा निवडणूक रणनिती आणि गुजरातमध्ये भाजपचे सदस्यता अभियान मिशन – 20 लाख यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच पश्चिम बंगालचे राज्यापाल नेमण्यासाठी 3 – 4 जणांचा पॅनेल असणार आहे.

या नेत्यांचे नाव रेसमध्ये –

मागील आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी केलेली टीका केंद्र सरकारने गांभीर्यांने घेतली आहे. पश्चिम बंगालला गुजरात होऊ देणार नाही असे ममता बोलल्या होत्या. त्यामुळे गुजराती राज्यपाल बनवण्याची एक मोठे कारण देखील हेच मानले जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह चूडासमा, पुर्व मंत्री जयनारायण व्यास यातील एकाचे नाव पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून फाइनल केले जाऊ शकते. हे तीनही नेता वरिष्ठ, अनुभवी आणि पीएम मोदींचे जवळचे आणि विश्वासू मानले जातात.

जर प्रशासकीय चेहरा देण्याचे झाले तर सीएम विजय रुपानी यांचे अ‍ॅडीशनल चीफ सेक्रेटरी कैलाशनाथ यांच्या नावावर मोहर लागेल. कैलाशनाथ पीएम मोदीचे जवळचे मानले जातात. या चार पैकी पश्चिम बंगालमध्ये राजभवनात पाठवण्याचे संकेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन