‘बॉयफ्रेंड नाही म्हणून मैत्रिणी चिडवतात’ असं सांगत 13 वर्षीय मुलीनं केलं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातच्या सुरतमधील एका 13 वर्षीय मुलीनं छेडछाडीची तक्रार करण्यासाठी पोलिसांत धाव घेतली. रस्त्यात काही मुलांनी तिच्यासोबत छेडछाड केल्याचं तिनं सांगितलं. पोलिसांनी रितसर चौकशीही केली. परंतु हा सगळा बनाव असल्याचं आणि तिनं स्वत:च केल्याचं स्पष्ट झालं. हे सगळं तिनं का केलं याचाही नंतर खुलासा झाला.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, सदर मुलगी गुरुवारी शाळेतून उशीरा परत आली. रस्त्यात काही मुलांनी तिच्यासोबत छेडछाड केल्याचं तिनं सांगितलं. यानंतर पालकांनी तिला घेऊन लगेचच पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सदर मुलीला सोबत घेतलं आणि तिला तिनं सांगितलेल्या ठिकाणी गेले. मुलगी पोलिसांना एका ठिकाणी घेऊन गेली. सायकलची चेन नीट करण्यासाठी थांबले असताना काही मुलांनी तिला छेडलं असं तिनं सांगितलं.

सीसीटीव्हीनं केला खुलासा
मुलीनं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. यासाठी त्यांनी परिसरातील दुकानदारांकडे विचारपूस केली. परंतु असं काहीही घडलं नसल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात तक्ररदार मुलगी रस्त्यावरून जाताना दिसली. तिनं छेडछाडीचं जे काही सांगितलं तसं काहीही न घडल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलं.

पोलिसांनी यानंतर सदर मुलीला विश्वासात घेतलं. सत्य घटना काय आहे हे तिला सांगण्यास सांगितलं. यानंतर मात्र पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागली. नंतर त्या मुलीनी हे सगळं खोटं असून तिनंच ही कथा रचल्याचं कबूल केलं. मुलांना ती खूप आवडते हे सांगण्यासाठी तिनं ही कथा रचल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. इतकंच नाही तर मला बॉयफ्रेंड नाही म्हणून मुली मला चिडवतात असंही तिनं म्हटलं.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like