Gulab Cyclone | किनारपट्टीवर ‘गुलाब चक्रीवादळा’चा रुद्रावतार, आगामी 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे काल दुपारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. पाकिस्तानने (Pakistan) या चक्रीवादळाचं ‘गुलाब चक्रीवादळ’ (Gulab Cyclone) असे नाव ठेवले आहे. यानंतर हे गुलाब चक्रीवादळ (Gulab Cyclone) आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि ओडिशा किनारपट्टीच्या (Odisha coast) दिशेनं सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टीवर चक्रीवादळाचा रुद्रावतार पहायला मिळत आहे. हे चक्रीवादळ आज (रविवार) रात्रीपर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील गोपालपूर आणि कलिंगपट्नम दरम्यान धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा (IMD alerts) इशारा दिला आहे.

हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर (Krishnananda Hosalikar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गोपालपूर किनारपट्टीवर साचलेले ढग दिसून येत आहेत. तसेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकायला येत आहे. अद्याप किनारपट्टीवर चक्रीवादळ (Gulab Cyclone) धडकलं नसताना देखील गोपालपूरमध्ये हवामानात तीव्र बदल (Climate change) झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस

पुढील काही तासात दोन्ही राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातमध्ये (Gujarat) पहायला मिळणार आहे. पुढील तीन दिवस राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवार (दि.27) आणि मंगळवार (दि.28) या दोन दिवशी राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Sangli Crime | शेजारील तरुणासोबत ‘चॅटिंग’ केल्याच्या संशयावरून ‘कुणाल’नं भावजय ‘सायली’ला संपवलं

सोमवारी 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने सोमवारी (दि.27) पुणे, नाशिक, सातारा, रायगड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. तर चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट (Red alert) देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांना सोमवारी यलो अलर्ट (Yellow alert) दिला असून मंगळवारी पावसाचा जोर वाढणार आहे.

मंगळवारी 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मंगळवारी (दि.28) राज्यातील रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, पुणे, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवार (दि.29) पासून राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Mumbai Pune Taxi | मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला; 100 रुपयांची भाडेवाढ

Pune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला गैरव्यवहार

Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gulab Cyclone | weather alerts today cyclone gulab update video imd alerts to maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update