Gulabrao Patil | ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बाजार होऊ शकत नाही’ – गुलाबराव पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत शिंदे गट वेगळा झाल्यापासून ठाकरे – शिंदे शीतयुद्ध सुरु झाले. दोनही गटांतील विस्तव जाता जात नाही. दोनही गट बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक कोण, हे सिद्ध करण्यासाठी लागले आहेत. त्यावर आज (दि. 17) पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बाजार होऊ शकत नाही, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)म्हणाले.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारांचा बाजार होऊ शकत नाही. त्यांचे विचार हे चिरंतन चालणारे विचार आहेत. पक्ष, संघटना, माणसे येत जात असतात. पण विचार कायम राहतात. विचार कधी मरत नाहीत. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचे विचार आबाधीत राहणार आहेत. त्यांच्या विचारांचा बाजार होणार नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सावरकरांवर अभ्यास नाही. त्यामुळे त्यांना सावरकरांवर बोलण्याचा अधिकार देखील नाही. हा मुद्दा काढून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचे हे काम काँग्रेस (INC) करत आहे. त्यामुळे कोणीही काही माफीनामे आणि कागद दाखवित असतील, त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. या भारतात दोन हिंदुहृदयसम्राट झाले. त्यातील एक सावरकर होते आणि दुसरे ठाकरे होते, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

 

वीर सावरकरांना भारतरत्न द्या, अशी आमची अनेक काळा पासूनची मागणी आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही करणार आहोत,
असे यावेळी पाटलांनी सांगितले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील सावरकर (Vinayak Damodar Savarkar) आणि
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती.
त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा जोर वाढत आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस सावरकरांनी अंदमानातून माफी मागून आपली सुटका करवून घेतली असे म्हणत आहे.
सावरकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा कडाडून विरोध आहे.

 

Web Title :- Gulabrao Patil | ‘Balasaheb Thackeray’s ideas cannot be marketed’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maha Vikas Aghadi | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पदवीधर सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी

Pune PMC – PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजना बंद झाल्याने यापुढील काळात या योजनेअंतर्गत नवीन प्रकल्प नाही

BMC Elections | BMC च्या प्रभागाच्या संख्येवरून आता पालिका आणि राज्य निवडणूक आयोग नोंदवणार जबाब; उच्च न्यायालयाचे याचिका सुनावणीवेळी आदेश