Gulabrao Patil | शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचा भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘गिरीश महाजनांनी आधी हिंदुत्व सिध्द करावं, मग बोलावं’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) हे शुक्रवारी (18 जून) जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे (BJP) गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर टीका केली आहे. ‘बाबरी मशिदीचा (Babri Masjid) ढाचा ढासळल्यानतंर भाजपच्या नेत्यांनी बाबरीचा ढाचा पाडल्याचे तेव्हा का कबूल केले नाही ? गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी याचे उत्तर देवून हिंदुत्त्व सिद्ध केल्यानतंरच या विषयावर बोलावे, असा घणाघाती निशाणा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी साधला आहे. त्यावेळी पाटील पत्रकारांशी बोलत होते. (Girish Mahajan should first prove Hindutva, then speak)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) म्हणाले की, भाजपच्या 72 नेत्यांनी तेव्हा बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे का कबूल केले नाही ? त्यावेळी पाय नाही हात आहे, हात नाही पाय आहे असे सांगणारा एकच बाप होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray). याबाबत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी बोलावे असे आव्हान देखील गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) दिले आहे.

चित्रा वाघांची सर्कशीतल्या वाघासारखी टीका –
शिवसेना (Shiv Sena) ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा नजराणा म्हणून आणले होते, तेव्हा अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर राहिलो असतो, असे छत्रपतींनी सांगितले होते. त्या महाराजांच्या विचारांवर चालणारी शिवसेना (Shiv Sena) आहे. त्यामुळे चित्रा वाघांनी (Chitra Wagh) सर्कशीतल्या वाघासारखं ज्या लोकांच्या बाबतीत टीका केली आहे, त्या भगिनीला माझी विनंती आहे. कोणत्याही भगिनीवर शिवसैनिक वार करणार नाहीत. जो गोंधळ झाला, तेव्हा शिवसेनेकडूनही महिला होत्या आणि भाजपकडूनही महिला होत्या. भगिनींना पाहून हल्ला झाला, असे नाही. मी या प्रकाराला मान्यता देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

या दरम्यान, बीएचआर (BHR) अर्थात भाईचंद हिरांचद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहारावर बोलताना गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) म्हणाले.
की, आता कारवाई सुरू आहे, त्यावर बोलणे उचित होणार नाही.
परंतु, ज्यांनी चुकीचे काम केलं आहे, त्यांना चुकीच्या कामाचे प्रायश्चित्त भोगावे लागेल.
चौकशी होऊ द्या, जे दोषी असतील ते समोर येतील, असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Gulabrao Patil | cabinet minister gulabrao patil say girish mahajan should first prove hindutva then speak

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

फ्लाइंग शिख मिल्खासिंग यांची प्राणज्योत मालविली

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित

Gold Price Today | लागोपाठ तिसर्‍या दिवशी घसरले सोन्याचे दर, आता 27651 रुपयात मिळत आहे 10 ग्राम गोल्ड