Gulabrao Patil | ‘चौकटीत राहून बोलावं, नाहीतर पाचोऱ्याच्या सभेत घसून…’, गुलाबराव पाटलांचा इशारा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमधील पाचोऱ्यात शिवसेना ठाकरे गटाची (Shiv Sena Thackeray Group) सभा होत आहे. परंतु या सभेपूर्वीच राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) इशारा दिला आहे. चौकटीत राहून बोलावं नाहीतर सभेत घसुणार असं आव्हान पाटील यांनी दिलं आहे. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या या इशाऱ्याला ठाकरे गट काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीकडून राज्यभरात वज्रमूठ सभा (MVA Vajramuth Sabha) घेतल्या जात आहेत. त्यांची पहिला सभा संभाजीनगर तर दुसरी सभा नागपूरात झाली. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते भाजप (BJP) आणि शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न मविआकडून केला जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील सभा घेतल्या जात आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगाव येथे सभा झाल्यानंतर आता त्यांची दुसरी सभा पाचोऱ्यात होणार आहे. या सभेवरुन गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊतांना इशारा दिला आहे.

दोघांची इच्छा आहे पण…

मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही. गुणही जुळत नाही.
त्यामुळे कोणती पुजा करावी लागते, हे एखाद्या ब्राह्मणाला विचारायला लागेल. पण वेळ येईल काळजी करु नका,
अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली.
तसेच अजित पवारांच्या (Ajit Pawar) भाजप प्रवेशाचा मुहूर्त खरंच आहे का? असं विचारलं असता,
ही वेळ लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राह्मणाचं म्हणणं आहे,
अशी मिश्कील टीप्पणी गुलाबराव पाटील यांनी बुधवारी केली होती.

Web Title :-  Gulabrao Patil | gulabrao patals warning to sanjay raut over the rally in pachora

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-पिंपरी क्राईम न्यूज : पिंपरी पोलिस स्टेशन – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नावाने बनावट सर्टिफिकेट तयार करुन संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी…

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : अखेर मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय ! 1 मे पासून नवीन बिलांचे वाटप, 30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सवलत